Gudi Padwa 2023 : गुढी कशी उभारावी?

Gudi Padwa 2023 : गुढी कशी उभारावी?

Shree swami samarth

Gudi Padwa 2023 : गुढी कशी उभारावी?

🌿चैत्र महिन्याचा पहिला दिवस आपण नववर्ष आणि गुढी उभारुन साजरा करतो. विशेष म्हणजे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.
🌿22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा हा सण आहे. सकाळी 6.29 ते 7. 39 हा गुढी उभारण्याचा मूहूर्त आहे. या मुहूर्तावरती कोणतीही चांगली खरेदी केली जाते. तसेच सोने खरेदी केले जाते. महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो.

🌿गुढीची उंच काठी बांबूपासून तयार केलेली असते. ज्या भागाला गुढी उभारायची आहे, तिथली जागा स्वच्छ करुन धुऊन पुसून घ्यावी.गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करावी.

काठीला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळावी. काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, लावून त्यावर तांब्या ठेवावा. अंगणात रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवावी.

काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करावी. गुढीला नैवेद्या दाखवून अगरबत्ती लावावी. संध्याकाळी हळद-कुंकू, फुले वाहून गुढी उतरवावी. अशा प्रकारे गुढीची पूजा केली जाते.

Shree swami samarth

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया