स्वामींची नीत्यसेवा म्हणजे काय? स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करावी?

स्वामींची नीत्यसेवा म्हणजे काय? स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करावी?

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पेजवर..!! “अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय”. मित्रांनो आयुष्यात अनेक अडचणी असतात. परंतु स्वामी महाराजांच्या दरबारात प्रत्येक अडचणींवर मात करण्याचा सामर्थ्य आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा अनेक अडचणी ज्या जीवन जगात असताना येत असतात त्या सर्व श्री स्वामी समर्थ महाराज यांची दररोज कमीत कमी अशी सेवा करावी. जेणेकरून आपले प्रश्न, आपल्या, समस्या आपल्या अडचणी मार्गी लागतील. त्यासाठी कोणती सेवा करायची आणि ती कशा पद्धतीने करावी हे आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो , सर्वप्रथम बाह्य शांती सूक्त, पितृ स्तुती स्तोत्र
रोज आंघळीनंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या फोटो जवळ अगरबती लाऊन वाचन करावे. यानंतर हातपाय तोंड धुऊन देवपूजा करावी. देवाला अष्टगंध लावावा तसेच देवीला हळदकुंकू लावावे. देव धुताना वेगवेगळी 2 ताट घ्यावी. एकाचवेळी सगळे देव एकत्र धुऊ नये. तदनंतर देव कापडाने स्वच्छपुसावे. मगच देवघरात ठेवावे. ओले देव देवघरात ठेऊ नये. स्वच्छ कापडाने पुसून मगच ठेवावे.

मित्रांनो या नंतर शक्य होईल त्या प्रमाणे खालील नित्यासेवा करावी – दररोज ११माळ जप श्री स्वामी समर्थ मंत्राचे करावे.
दररोज ३अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्र सारमृत वाचन करावे. त्यात २१ अध्याय असतात. ७दिवसात १पारायण होते. उदा आज१,२,३, उद्या ४,५,६, परवा७,८,९, नंतर१०,११,१२, नंतर १३,१४,१५, नंतर१६,१७,१८ नंतर१९,२०,२१ याप्रमाणे वाचून झाले की नवीन पारायण परत १,२,३, अशी अखंड सेवा चालू ठेवावी.

दररोज पंच महायज्ञ करावा. नित्य सेवेतील स्तोत्र,मंत्र, वारानुसार सेवा करावी. देवीचे मंत्र १६वेळेस, देवाचे मंत्र११ वेळेस, फक्त गायत्री मंत्र २४ वेळेस करावा. रात्री १ वेळ कालभैरवाष्टक वाचावे.
मित्रांनो, वर्षभरात कमीत कमी १ मोठ भागवत पारायण, ३ सुलभ नवनाथ पारायण, ७ गुरुचरित्र पारायण, ११ मल्हारी सप्तशती पाठ, तसेच १४ दुर्गा सप्तशती पाठ, वर्षभरात पितरांची सेवा करताना तिथीला श्राद्ध, अमावस्येला हिरण्य दान मुंजोबा सेवा मंजोबा जेऊ घालणे, वर्षभरात येणारे सणवार व्रत.

खंडोबा नवरात्री, देवी नवरात्र अशी कुलाचाराप्रमाने सेवा तसेच कुलदेवता, कुलदैवत मानसन्मान शक्यतो मूळ स्थानावर जाऊन करावा. शक्य असेल तर सोबत देवी साठी साडी, खन, नारळ, देवीचे अलंकार व पुरणाचा नेवेद्य दाखवून वेळ असल्यास दुर्गासप्तशती पाठ, कमी वेळ असल्यास नवर्नव मंत्र १६ माळ, आणि अतीघाई असल्यास कमीत कमी सिद्धकुंजिका स्तोत्र शक्यतो वाचावे. जेणे करून आपल्याला देवीचा पाठ केलेचे फळ मिळते. घरी आल्यावर ९ कुमारिका यांना जेऊ घालणे. यथा शक्ती त्यांना काही तरी भेट वस्तू द्यावी.

स्वामींची नीत्यसेवा म्हणजे काय? स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करावी?

मित्रांनो, यापैकी कुठलीही सेवा करताना सुरवातीला श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनोमन आपले गुरु स्वीकारून आमची साधी भोळी सेवा रुजू करून घ्यावी. आमचे प्रश्न ,समस्या दुःख, व्याधी, समाप्त करून सुखी समाधानी ठेवा. कायम तुमची सेवा आमच्या कडून करून घ्यावी. अशी नम्र प्रार्थना स्वामींना करावी.
सेवा करताना स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वासाने करावी.

आपल्या मागील जन्माचे दोष यांची तीव्रता आपणास या मार्गातून दिलेली स्वामी सेवा ही परमपूज्य गुरुमाऊली यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेऊन गुरूआज्ञा मानून मनापासून केलेले सेवेच पुण्य यावर आपले दोष १०१%कमी होतातच, असा आमचा व या मार्गातील सर्व सेवेकरी यांना आलेल्या अनुभूती वरून वरील सेवा मी महाराज माऊली यांचा एक साधारण सेवेकरी या नातेने सांगावीशी वाटली म्हणून मी तुमच्यासमोर या महितिस्वरुपत मांडली शेवटी म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि स्वामींचे बोधवाक्य आहेच की,
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

स्वामींची नीत्यसेवा म्हणजे काय? स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करावी?

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया