याच शेतकऱ्यांना मिळणार परत पीक कर्जाचा लाभ,

याच शेतकऱ्यांना मिळणार परत पीक कर्जाचा लाभ, बघा तुमचे नाव आहे का यादीत…

याच शेतकऱ्यांना मिळणार परत पीक कर्जाचा लाभ, 

याच शेतकऱ्यांना मिळणार परत पीक कर्जाचा लाभ
शेती आणि शेतकऱ्यांसाठी असलेला एक महत्त्वाचा असा घटक म्हणजे पीक कर्ज. शेतकऱ्यांची मशागतीची कामे बी बियाण्याची खरेदी, रासायनिक खताची खरेदी किंवा शेतीच्या इतर कामासाठी असलेली पैशाची गरज ही एक पिक कर्जाच्या माध्यमातून पूर्ण केले जाऊ शकते आणि याच्यासाठी शेतकऱ्यांना आशा असते ती म्हणजे नवीन पीक कर्जाची.

हेच नवीन पीक कर्ज कधी दिले जाणार, कोणाला याच्यातून पीक कर्ज मिळणार याच्या संदर्भातील काही नवीन अपडेट, माहिती आज आपण जाणून घेऊया.

सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून 2021 पासून दिले जाणारी पिक कर्ज ही एक रुपयापासून तीन लाख रुपया पर्यंतचे पीक कर्ज हे बिनव्याजी करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये एक लाख रुपये पर्यंतचे पिक कर्जही राज्य शासनाच्या माध्यमातून बिनव्याजी तर एक लाखापासून तीन लाख रुपया पर्यंतचे पीक कर्ज केंद्र शासनाने राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्णपणे बिनव्याजी दिली जातात.

यासाठी आपण जर पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन बैठकीच्या माध्यमातून, आढावा बैठकीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक कर्जाच्या वाटपाचं उद्दिष्ट दिले जातात ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर खाजगी बँका राष्ट्रीयीकरण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातूनही पीक कर्ज वाटप केले जातात.

शेतकऱ्यांना पीक कर्जाचा वाटप करत असताना मोठ्या प्रमाणात सहभाग व मोठ्या प्रमाणात जो वाटा आहे तो म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या स्थितीत आहेत, बऱ्याच साऱ्या जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँका आलेल्या आहेत अशा जिल्ह्यामध्ये मात्र खाजगी बँकांच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जातात. मात्र ज्या जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या स्थितीत आहे त्या बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा केला जातो आणि याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून त्यांना काही अनुदान काही मदत देखील केली जाते.

आपण जर पाहिलं तर जे शेतकरी 31 मार्च 2023 पर्यंत आपल्या पिक कर्जाची परतफेड करतील अशा नियमित असलेल्या शेतकऱ्यांना या बँकांच्या माध्यमातून पिक कर्ज देण्यासाठी सुरुवात केली जाते. अर्थात नवीन पीक कर्ज घेण्यासाठी पहिली पिक कर्ज ही परतफेड करणे आवश्यक आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्याने अद्याप पर्यंत पीक कर्ज घेतलेले नाहीत असे नवीन शेतकरी सुद्धा याच्या अंतर्गत पीक कर्ज वाटपासाठी पात्र होतात परंतु ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकीत आहे जे खाते एम पी ए मध्ये गेलेले आहेत अशा शेतकऱ्यांना मात्र याच्या अंतर्गत पीक कर्ज देण्यासाठी बँका टाळाटाळ करतात.

याच्यामुळे आपण जर पाहिलं तर आता नवीन प्रोत्साहन पर अनुदान योजनेमध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली आहे त्याच्यामुळे जवळजवळ त्यांचे कर्ज खाते निल झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्या अंतर्गत नवीन पीक कर्ज मिळतील परंतु ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी झालेले परंतु त्यांच्या खात्यामध्ये कर्जाचे रक्कम आलेली नाही अशा शेतकऱ्यांना मात्र बँकांच्या माध्यमातून कर्ज दिले जात नाहीत.

याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर वैयक्तिक जमीनधारणा केलेले जे शेतकरी आहेत ज्यांनी अद्याप पर्यंत पीक कर्ज घेतलेले नाहीत अशा शेतकऱ्यांना सुद्धा याच्या अंतर्गत पीक कर्ज घेता येतात त्याच्यामध्ये तुमच्या शेतामध्ये असलेली लागवड कापूस आहे की सोयाबीन आहे किंवा तुम्ही काय लागवड करणार आहात त्या लागवडीच्या अनुषंगाने किंवा तुमच्या सातबारावरती मागील वर्षेच असलेल्या नोंदी या अनुषंगाने प्रतिहेक्टरी जो एक निकष ठरवण्यात आलेला असतो जो एक दर ठरवण्यात आलेला असतो त्या दरानुसार त्या पीक कर्जाचे वाटप केलं जातं ज्याच्यासाठी तुम्हाला सातबारा आठ त्याचप्रमाणे विहित नमुन्यातील एक प्रस्ताव याचबरोबर चतुश्रीमा असे काही कागदपत्र द्यावी लागतात.

पिक कर्ज देत असताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे खाते एम. पी. ए. मध्ये गेलेले असतात त्यांना बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती परंतु यावर्षीपासून आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना लावली जाणारी जी सिबिलची अट आहे ती सिबिलची अट हटवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे यावर्षी पिक कर्ज वाटप होत असताना या सिबिलची अट सुद्धा लावली जाणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर आता दिलेल्या लक्षांक अनुसार दिलेल्या निर्देशानुसार आता या बँकेच्या माध्यमातून पीक कर्जाच वाटप सुरू केला जाणार आहे.

ज्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर सर्वात प्रथम नाशिक जिल्ह्याच्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून एक एप्रिल पासून या पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे ज्याच्यामध्ये नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्यांने या बँकेच्या माध्यमातून पीक कर्जाचा पुरवठा केला जाईल.

याप्रमाणे धुळे नंदुरबार बँकेच्या माध्यमातून 5 एप्रिल पासून हे पिक कर्ज वाटप सुरू केलं जाणार आहे आणि याचप्रमाणे हळूहळू सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून साधारणपणे 15 एप्रिल पर्यंत पिक कर्जाची वाटप सुरू केली जातील वाटप केलं जात असताना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले जातात ऑफलाइन पद्धतीने पीक कर्जाचे मागणी केली जाते.

त्याच्यामुळे 2023 मध्ये या पिक कर्जाचं वाटप केलं जात असताना ऑनलाईन पद्धतीने मागणी करण्यासाठीचे जे काही सवलत असेल ती प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दिली जाईल अशा प्रकारचे एक सुद्धा शक्यता आहे कारण गेल्या वर्षी सुद्धा परभणी असेल नांदेड असेल किंवा इतर जिल्हे असतील अशा जवळजवळ 13 ते 14 जिल्ह्याच्या माध्यमातून हे ऑनलाईन पद्धतीने मागणी करून शेतकऱ्यांचे पीक कर्जाची पूर्तता करण्यात आलेली होती.

तर मित्रांनो तुम्ही जर आत्तापर्यंत पीक कर्जाची परतफेड केलेले नसेल तर 31 मार्च 2023 पर्यंत आपली पिक कर्जाची परतफेड करून नवीन पीक कर्ज घेण्यासाठी पात्र व्हा अन्यथा तुम्हाला पिक कर्ज देण्यामध्ये सुद्धा बँक टाळाटाळ करू शकतात किंवा त्याच्यामध्ये पुढे तुम्हाला उशीर सुद्धा होऊ शकतो. बऱ्याचशा बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवं जुनं करणं असेल किंवा इतर काही प्रक्रिया असतील त्या करून सुद्धा या ठिकाणी पतपुरवठा केला जातो.

These farmers will get the benefit of return crop loan

हि पोस्ट आवडल्यास खाली दिलेल्या स्टारचे⭐ चिन्ह दाबून नक्की लाईक करा

WhatsApp group link – शासकीय योजना ग्रुप

https://chat.whatsapp.com/LTBu26lHpbvCXMnXd3hIIk

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया