प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण पुर्ण प्रोसेस…


प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण


प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते.
ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.
लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी आहेत.


वरील अटींची पुर्तता करणाऱ्या व कायम प्रतिक्षा यादीत समाविष्ट न झालेल्या कुटूंबांनी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
सन 2002 मध्ये झालेल्या दारिद्रय रेषेच्या सर्व्हेनुसार सन 2007-08 ते सन 2014-15 मध्ये लाभार्थ्यांची निवड करून घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे.


सन 2011 च्या आर्थिक सामाजिक व जात सर्वेक्षणाची माहितीच्या आधारे सन 2015-16 पासून पुढील वर्षांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रू.95,000/- इतके अर्थसहाय दिले जाते.
घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.
स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.


प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण
सन 2016-17 पासून प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जाणार आहे.
घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रू.1.20 लक्ष व नक्षलग्रस्त भागाकरिता रू.1.30 लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येणार आहे.
प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेचे अर्थसहाय राज्यस्तरावरील बँक खात्यातून PFMS प्रणालीव्दारे लाभार्थ्यांच्या बँक/पोस्ट खात्यात जमा होणार आहे.
प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, 2011 मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडीकरिता वापरण्यात येणार आहे.


प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक सहाय्य पुरविण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सहाय्य संस्था गठीत करण्यात येणार आहे.
घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मुजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.


स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.
प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण व अन्य ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण गठीत करण्यात आला आहे.

कक्षाचे कार्यालय सिडको भवन, 5 वा मजला, सी.बी.डी.बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यरत आहे. श्री. संतोष कवडे, संचालक
व श्रीमती मंजिरी टकले, उप संचालक

यांचेमार्फत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी केली जाते.

  • प्रधानमंत्री आवास योजना
  • प्रधानमंत्री
  • महाराष्ट्र
  • स्वच्छ भारत
  • प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण
  • https://pmay-urban.gov.in/
  • pradhanmantri aawas yojana
  • pradhanmantri
  • pradhanmantri samman nidhi yojana
  • bharat ke pradhanmantri kaun hai
  • pradhanmantri yojana
    • pradhanmantri kisan samman nidhi yojana

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया