शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! यंदा उन्हाळी कांदा तेजीत राहणार का?

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक!

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! यंदा उन्हाळी कांदा तेजीत राहणार का?

Unhali Kanda Bajarbhav :

सध्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याला मात्र पाच ते सहा रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. यामुळे पिक उत्पादनासाठी आलेला खर्च देखील भरून निघत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिंदे फडणवीस सरकारने 350 रुपये प्रति क्विंटल इतक अनुदान शेतकऱ्यांसाठी मंजूर केल आहे.

कॅबिनेट मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यात हे अनुदान वितरित होणार असल्याची माहिती देखील दिली आहे. दरम्यान राज्यात उन्हाळी कांद्याची आवक देखील होऊ लागली आहे. उन्हाळी कांद्याला मात्र पावसाळी कांद्यापेक्षा अधिक भाव मिळत असल्याचे बाजारात चित्र आहे. यामुळे लाल कांदा जरी कवडीमोल दरात विक्री झाला असला तरी देखील उन्हाळी कांद्यातून चांगली कमाई होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! यंदा उन्हाळी कांदा तेजीत राहणार का?

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! यंदा उन्हाळी कांदा तेजीत राहणार का?

दरम्यान काही तज्ञांनी उन्हाळी कांदा बाजार भावात तेजी राहणार असल्याचे मत व्यक्त केल आहे. तज्ञ लोकांच्या मते यंदा उत्तरेकडील राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाळी कांदा उत्पादित झाला. शिवाय राज्यातही मोठ्या प्रमाणात लाल कांद्याचे उत्पादन झाले. या परिस्थितीत देशांतर्गत कांद्याची उपलब्धता अधिक राहिली. यामुळे कांद्याला अपेक्षित असा भाव मिळाला नाही.

परंतु उत्तरेकडील राज्यात कांदा साठवणुकीसाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने अधिक टिकवनक्षमता असलेला कांदा म्हणजेच उन्हाळी कांदा आगामी काळात चांगल्या दरात विक्री होऊ शकतो, असा अंदाज तज्ञांचा आहे. शिवाय, अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे उन्हाळी कांदा पिक प्रभावीत झाले आहे. यामुळे उत्पादनात देखील घट होऊ शकते.

म्हणून उन्हाळी कांदा दरात तेजी राहू शकते असा अंदाज बाजार अभ्यासकांनी यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनमाड एपीएमसी मध्ये उन्हाळी कांदा विक्रीसाठी आला होता. यावेळी एपीएमसी मध्ये पूजन करून कांद्याला बोली लावण्यात आली. यावेळी उन्हाळी कांद्याला 1501 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला.

तसेच सरासरी बाजार भाव 1000 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला. लाल कांदा मात्र ८२६ रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल दरात आणि सहाशे रुपये प्रतिक्विंटल एवढ्या सरासरी दरात विक्री झाला. निश्चितच उन्हाळी कांदा दरात तेजी राहणार असल्याचा तज्ञांचा अंदाज पाहता शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया