तुम्हाला माहीती आहेत का या योजना? शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजना

शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजना
शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजना कोणत्या आहेत या योजना
मित्रांनो, आपला भारत देश कृषीप्रधान देश असल्याकारणाने शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्रशासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. कारण मोठ्या प्रमाणावर शेती हा व्यवसाय केला जातो. त्यामुळे अश्या योजना राबविण्याचा मुख्य हेतू म्हणजे शेतकरी समृद्ध व्हावा, शेतकऱ्यांचा विकास व्हावा हा होय.
PM नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी विविध अश्या योजना, उपाय व सुविधा चालू करण्यात आल्या आहेत. अश्याच महत्वाच्या 5 योजनाबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
PM किसान योजना
PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या अनुषंगाने ही योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दर वर्षाला 6,000 रु. इतकी रक्कम दिली जाते.
PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी अथवा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे, त्यानंतर शेतकऱ्यांची पात्रता तपासून त्यांना दर 4 महिन्याला 2,000 रु. याप्रमाणे वर्षभरात 3 हफ्ते दिले जातात.
तुम्हाला माहीती आहेत का या योजना? शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा जोखीम विमा उतरवता येतो. योजनेमध्ये सहभाग घेतल्यानंतर शेतकऱ्यांमार्फत शेतात पिकविण्यात आलेल्या पिकावर शेतकऱ्यांना विमा दिला जातो. ज्यामध्ये विविध प्रकारच्या जोखीम स्तरांचा समावेश आहे. जसे अतिवृष्टी, पुर, ढगफुटी, काढणीपश्चात नुकसान, काढणीपूर्व पीक नुकसान इत्यादी.
शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीमार्फत ठरविण्यात आलेल्या नुकसान भरपाई टक्केवारीनुसार शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची भरपाई दिली जाते.
किसान क्रेडिट कार्ड योजना
किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिलं जातं. या कार्डचा वापर करून शेतकरी आवश्यक वेळीस काही रुपयाची गरज भासल्यास क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रक्कम काढून घेऊ शकतात व मुदतीमध्ये परतफेड करू शकतात.
किसान क्रेडिट कार्डचा मुख्य फायदा म्हणजे यासाठी चा वार्षिक व्याजदर खूपच कमी आहे सोबतच मुदतीमध्ये व्याज परतावा केल्यास सूट म्हणून व्याजदरामध्ये काही प्रमाणात घट करण्यात येते. त्याचप्रमाणे इतरत्र पैशाची मागणी न करता शेतकऱ्यांना एक हक्काचा स्त्रोत मिळतो.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना
शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेच शेतकऱ्यांनासुद्धा वयोवृद्ध अवस्थेमध्ये पेन्शन मिळवून द्यावे या अनुषंगाने शासनामार्फत प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू करण्यात आली.
योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वयोमर्यादेनुसार एक निश्चित रक्कम दरमहा भरावी लागेल त्यानंतर वयाच्या साठव्या वर्षी शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये याप्रमाणे पेन्शन सुरू होईल.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाण्याचा पुरवठा उपलब्ध व्हावा या अनुषंगाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आली. पाण्याचा अयोग्य वापर टाळावा व योग्य वापराने कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी पारंपरिक शेती सोबतच इतर व्यवसायसुद्धा पाणी उपलब्धतेमुळे करावेत हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
यावर आपले मत नोंदवा