महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज…! कांदा अनुदानाची यादी आली, ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

Kanda anudan
Kanda anudan

Kanda Anudan Yojana Maharashtra : कांदा हे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी जवळपास 23 ते 24 जिल्ह्यात उत्पादित होणारे एक मुख्य कॅश क्रॉप म्हणजेच नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाची राज्यभर लागवड होते. अर्थातच राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून आहे.

मात्र हे नगदी पीक अनेकदा शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरते. या चालू वर्षातील फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात याची प्रचिती आपल्याला आलीच आहे. फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये कांदा या नगदी पिकाला खूपच कवडीमोल दर मिळाला होता. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला.

पण अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा मिळेल असे सांगितले जात होते, पण अस काही झालं नाही. अशातच मात्र कांदा अनुदानासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून आवश्यक असलेल्या 844 कोटी पैकी 465.99 कोटी रुपये एवढा निधी राज्याच्या पणन विभागाला वितरित करण्यात आला आहे.

तसेच कोणत्या जिल्ह्याला किती अनुदान मिळणार याची यादी देखील शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. 18 ऑगस्ट रोजी या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय शासनाने निर्गमित केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कांदा अनुदानासाठी आवश्यक असलेल्या 844 कोटी पैकी 465.99 कोटी एवढा निधी पहिल्या टप्प्यासाठी उपलब्ध झाला आहे.

यातून राज्यातील 23 जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. कांदा अनुदानाचा हा लाभ तीन लाख 36 हजार 476 शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अनुदान दिले जाणार आहे याची यादी पाहणार आहोत.

शासनाने 18 ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार, नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, वाशिम या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातच शंभर टक्के अनुदान वितरित केले जाणार आहे.

तसेच नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड या 10 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 53.94% एवढा अनुदानाचा निधी वितरित होणार असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित निधी दिला जाणार आहे.

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया